चिखलीच्या बाजारात ‘कोठारी’ वादळ! धडाकेबाज बोलीने सोयाबीनने गाठला ८ हजारांचा उच्चांक; बळीराजा सुखावला

चिखली (बुलढाणा) | CCN न्यूज ब्युरो: चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची पर्वणी पाहायला मिळाली. बाजार समितीतील नामवंत खरेदीदार गोविंद कोठारी यांच्या जबरदस्त जोश आणि धडाकेबाज बोलीमुळे सोयाबीनच्या दराने ऐतिहासिक उसळी घेतली असून, दर थेट आठ हजार रुपयांच्या घरात जाऊन पोहोचले आहेत. या विक्रमी दरामुळे लिलाव स्थळी एकच उत्साह संचारला होता […]