कानठळ्या बसवणारा आवाज अन् गोदामाचा चक्काचूर! माथनी शिवारात जिलेटिनच्या स्फोटाने उडाली खळबळ; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

खामगाव (बुलढाणा) | CCN न्यूज ब्युरो: खामगाव तालुक्यातील माथनी गाव शिवारात साठवणूक करून ठेवलेल्या जिलेटिन आणि डिटोनेटरचा अचानक भीषण स्फोट झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या स्फोटाची तीव्रता इतकी भयानक होती की, संपूर्ण माथनी शिवार हादरून गेले असून, संबंधित गोदामाच्या भिंती आणि छत अक्षरशः जमीनदोस्त झाले आहेत. सुदैवाने घटनेच्या वेळी गोदाम बंद होते आणि तेथे […]