ज्या धरणांत ७० टक्क्यांपेक्षा अधिक पाणी, तिथल्या शेतकऱ्यांना उभी पिके वाचवण्यासाठी किमान दोन वेळा ठिबक-स्प्रिंकलरने पाणी द्या; जनावरांसाठी चारा निर्मितीची संधीही द्या! रविकांत तुपकरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे आक्रमक मागणी!

बुलढाणा | CCN न्यूज (प्रतिनिधी) : जिल्ह्यात दुष्काळाचे सावट गडद होत असताना शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या तुर, हळद यासारख्या पिकांना वाचवण्याची शेवटची संधीही हिरावून घेऊ नका! बुलढाणा जिल्ह्यात ज्या ज्या धरणांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे, त्या धरणांच्या परिसरातील शेतकऱ्यांना किमान दोन वेळा तरी ठिबक सिंचन किंवा स्प्रिंकलरद्वारे पाणी देण्याची परवानगी द्या. केवळ उभी पिके […]