महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी आता ‘प्रोजेक्ट संजीवनी’!

बुलढाणा | CCN न्यूज: महिला व बालकांना सुरक्षित वातावरण मिळावे, त्यांच्यावरील अत्याचारांना प्रतिबंध व्हावा आणि संकटाच्या काळात तातडीने मदत मिळावी, या उद्देशाने बुलढाणा जिल्हा पोलिसांच्या वतीने ‘प्रोजेक्ट संजीवनी’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम कार्यान्वित करण्यात आला आहे. अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील यांच्या हस्ते बुलढाणा येथील सहकार विद्या मंदिरात या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. […]