प्रचाराच्या रणधुमाळीत शिक्षण हरवत तर नाही ना?; शिक्षक निवडणुकीमुळे पालकांमध्ये चिंता

बुलढाणा (देऊळगाव राजा सुनील मतकर) अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी दिवसेंदिवस रंगत असून उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी प्रचाराला वेग दिला आहे. या प्रचारात मतदार हा शिक्षक असल्यामुळे त्याचा सक्रियपणे सहभागी होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. मात्र, दुसरीकडे शाळांमध्ये नियमित अध्यापन सुरू असताना पहिल्या सत्राच्या परीक्षा तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे प्रचाराच्या धामधुमीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष […]