हळद पिकाला भर देणे: भरघोस आणि दर्जेदार उत्पादनाची गुरुकिल्ली

गजानन तुपकरविषय विशेषज्ञ (उद्यानविद्या)कृषी विज्ञान केंद्र, अकोला हळद हे आपल्या राज्यातील शेती अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे एक प्रमुख आणि खात्रीशीर नगदी पीक आहे. हळदीचे दर्जेदार आणि विक्रमी उत्पादन घेण्यासाठी केवळ लागवड, खते आणि पाणी व्यवस्थापन पुरेसे नसते. हळद हे जमिनीखाली वाढणारे कंदवर्गीय पीक असल्यामुळे, त्याच्या जमिनीवरील व्यवस्थापनाइतकेच जमिनीखालील कंदांच्या वाढीला पोषक वातावरण निर्मिती करणे आवश्यक असते. […]