दुष्काळाचे संकट संधीत रूपांतरित करा; जलसंवर्धनाच्या कामांसाठी गावागावांत सूक्ष्म नियोजन करा! – आ. श्वेता महाले पाटील

मालगणी व सवना येथे विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह दुष्काळनिवारणार्थ ग्रामस्थांच्या बैठका संपन्न… चिखली, बुलढाणा | CCN न्यूज: संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच गावपातळीवर सूक्ष्म नियोजन करून जलसंवर्धन, मृदासंवर्धन आणि दुष्काळ निवारणाची कामे व्यापक प्रमाणात हाती घेण्याचे आवाहन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी केले. मालगणी व सवना येथे दुष्काळ […]
चिखलीच्या बाजारात ‘कोठारी’ वादळ! धडाकेबाज बोलीने सोयाबीनने गाठला ८ हजारांचा उच्चांक; बळीराजा सुखावला

चिखली (बुलढाणा) | CCN न्यूज ब्युरो: चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची पर्वणी पाहायला मिळाली. बाजार समितीतील नामवंत खरेदीदार गोविंद कोठारी यांच्या जबरदस्त जोश आणि धडाकेबाज बोलीमुळे सोयाबीनच्या दराने ऐतिहासिक उसळी घेतली असून, दर थेट आठ हजार रुपयांच्या घरात जाऊन पोहोचले आहेत. या विक्रमी दरामुळे लिलाव स्थळी एकच उत्साह संचारला होता […]
बुलढाणा जिल्ह्यात कामगार संघटनेला नवी धार; भारतीय मजदूर संघाच्या जिल्हाध्यक्षपदी विष्णूभाऊ मुकुंदे, तर महामंत्रीपदी राजेंद्रजी दांडगे यांची वर्णी!

खामगाव, बुलढाणा (CCN न्यूज ब्युरो) : देशातील सर्वात मोठी कामगार संघटना असलेल्या भारतीय मजदूर संघाचे बुलढाणा जिल्हा त्रैवार्षिक अधिवेशन सुटाळा बु. येथील महादेव मंदिर परिसरात अत्यंत उत्साहपूर्ण आणि भारावलेल्या वातावरणात संपन्न झाले. या अधिवेशनात आगामी तीन वर्षांसाठी संघटनेची नवीन जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, हिंदुस्तान लिव्हर कामगार संघाचे संघटन मंत्री श्री. विष्णूभाऊ मुकुंदे यांची […]
दुष्काळी परिस्थितीत ग्रामपंचायतींचा कारभार सुरळीत चालण्यासाठी सरपंचांना प्रशासकीय अधिकार द्या! – आ. श्वेता महाले पाटील

विकासकामे प्रभावीत होऊ नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी.. चिखली, बुलढाणा CCN न्यूज: महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील विकासकामे आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांची कामे रखडू नयेत, यासाठी ग्रामपंचायतींचा कारभार पाहणाऱ्या सरपंच प्रशासकांना आवश्यक प्रशासकीय व आर्थिक अधिकार प्रदान करावेत, अशी मागणी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र […]
कानठळ्या बसवणारा आवाज अन् गोदामाचा चक्काचूर! माथनी शिवारात जिलेटिनच्या स्फोटाने उडाली खळबळ; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

खामगाव (बुलढाणा) | CCN न्यूज ब्युरो: खामगाव तालुक्यातील माथनी गाव शिवारात साठवणूक करून ठेवलेल्या जिलेटिन आणि डिटोनेटरचा अचानक भीषण स्फोट झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या स्फोटाची तीव्रता इतकी भयानक होती की, संपूर्ण माथनी शिवार हादरून गेले असून, संबंधित गोदामाच्या भिंती आणि छत अक्षरशः जमीनदोस्त झाले आहेत. सुदैवाने घटनेच्या वेळी गोदाम बंद होते आणि तेथे […]
पत्रकारितेच्या क्षेत्रात बुलढाण्याचा डंका!

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी सचिन ठाकरे यांची निवड मान्यवरांच्या उपस्थितीत अकोला येथे नियुक्तीपत्र प्रदान; पत्रकारांच्या हक्कांसाठी लढणार असल्याचा निर्धार बुलढाणा / खामगाव (CCN न्यूज नेटवर्क) | दूरदर्शन सह्याद्री न्यूज आणि आकाशवाणी वृत्त विभागाचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी श्री. सचिन किशोरजी ठाकरे यांची पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव आणि सामाजिक बांधिलकीची दखल घेत, ‘लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या’ बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी […]
पत्रकारांच्या नावाने ‘दिवाळी’! स्थानिक गुन्हे शाखेच्या नावावर वसुलीचा खेळ कोणाचा?

देऊळगाव राजा, बुलढाणा | CCN न्यूज, (सुनील मतकर) देऊळगाव राजा, देऊळगाव मही, अंढेरा आणि सिंदखेड राजा परिसरात सध्या स्थानिक गुन्हे शाखेच्या नावाने कथित वसुली होत असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. विशेष म्हणजे, ‘पत्रकारांच्या दिवाळीसाठी पैसे द्यावे लागतील’, असे सांगून काही व्यावसायिकांकडे पैशांची मागणी झाल्याचा दावा केला जात असल्याने या प्रकरणाची चांगली चर्चा सुरु आहे. सराफ […]
१२ हजार मेंढ्या, २ हजार पिल्लं अन् २५ उंट… निमखेडीच्या सीमेवर थांबला राजस्थानचा ताफा!

दुष्काळात स्थानिक पशुधनासाठी चारा राखण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश | ‘जिल्ह्यात मेंढ्या चारणार नाही, फक्त रस्त्याने जाऊ द्या,’ मेंढपाळांची प्रशासनाकडे विनंती बुलढाणा | CCN न्यूज: राजस्थानातून मध्य प्रदेशमार्गे महाराष्ट्राकडे निघालेल्या मेंढपाळांचा मोठा ताफा बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर रोखण्यात आला. जळगाव जामोद तालुक्यातील निमखेडी येथील वनविभागाच्या तपासणी नाक्याजवळ वनविभाग आणि पोलिसांनी ही कारवाई केली. प्राप्त माहितीनुसार, या ताफ्यात १२ […]
पेन्शन थांबली, खरे धावले! गणेश आंभोरेंच्या दिवाळीत मदतीचा हात

भाजप जिल्हा सरचिटणीस विजयसिंग खरे यांच्या पाठपुराव्याने विनामूल्य ‘यूडीआयडी’ कार्ड मिळाले. दरमहा २,५०० रुपयांची दिव्यांग पेन्शन पुन्हा सुरू होण्याचा मार्ग सुकर CCN न्यूज, चिखली चिखली शहरातील सांडू ऊर्फ गणेश आंभोरे यांची दिव्यांग पेन्शन काही महिन्यांपासून बंद होती. दरमहा मिळणारे २,५०० रुपये थांबल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला होता. ही अडचण समजताच भाजपचे जिल्हा सरचिटणीस विजयसिंग […]
कोळी महासंघाच्या बुलढाणा घाटावरील जिल्हाध्यक्षपदी राम सुरडकरांची फेरनिवड!

लोणावळ्यातील राज्यस्तरीय बैठकीत सुरडकरांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास | घाटाखालील जिल्हाध्यक्षपदी पुरुषोत्तम झाल्टे | जात प्रमाणपत्र आणि जातवैधतेतील अडचणींवर मंथन CCN न्यूज लोणावळा | १५ नोव्हेंबर २०२६ कोळी महासंघाने बुलढाणा जिल्ह्यातील संघटनात्मक जबाबदाऱ्यांची विभागणी करत घाटावरील जिल्हाध्यक्षपदी चिखली येथील राम सुरडकर यांची फेरनिवड केली. तर घाटाखालील जिल्हाध्यक्षपदी नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पुरुषोत्तम झाल्टे यांची […]