रस्ता नाही… म्हणून उभ्या केळीवर कोयता!; टाकरखेड भागिलेतील शेतकऱ्याच्या लाखोंच्या स्वप्नांचा चक्काचूर

सुनील मतकर देऊळगाव राजा, बुलढाणा | CCN न्यूज : शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्यासाठी शासनाकडून सातत्याने प्रोत्साहन दिले जाते. पारंपरिक पिकांऐवजी नगदी पिकांची लागवड करून उत्पन्न वाढविण्याचे आवाहन केले जाते. मात्र, शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसेल, तर आधुनिक शेतीचे स्वप्न किती विदारक पद्धतीने उद्ध्वस्त होऊ शकते, याचे हृदय पिळवटून टाकणारे उदाहरण देऊळगाव राजा तालुक्यातील टाकरखेड भागिले […]