घराघरांत उजेड पेरणाऱ्या ‘नवदुर्गा’; चिखलीच्या वीजसेवेतील नारीशक्तीला सलाम!

नवरात्रोत्सव विशेष : महावितरणच्या नऊ महिला कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठेतून स्त्रीशक्तीचा जागर; सेवाभाव अन् जबाबदारीने जपला प्रकाशाचा धागा गोपाल तुपकर चिखली, बुलढाणा | CCN न्यूज : कुठे आदिशक्तीच्या आरतीचा गजर, तर कुठे देवीसमोर तेवणाऱ्या दिव्यांचा लखलखाट… नवरात्रोत्सवात सर्वत्र स्त्रीशक्तीची आराधना सुरू असताना आपल्या दैनंदिन सेवेतून समाजाच्या प्रकाशव्यवस्थेला हातभार लावणाऱ्या चिखलीच्या महावितरणमधील नऊ महिला कर्मचाऱ्यांचे योगदानही मोलाचे ठरते. […]